नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या पाचव्या भागात सहभागी होण्यासाठीची मुदत ३ फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातले विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधतात, आयुष्य म्हणजे उत्सव या संकल्पनेनुसार परीक्षाकाळातला ताणतणाव दूर करण्याविषयी चर्चा करतात. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक स्पर्धेतर्फे निवडले जातील.