पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडीटेशन (एनबीए) यांचे अतिशय प्रतिष्ठेचे मानांकन या महाविद्यालयास प्राप्त झाले आहे अशी माहिती पीसीईटीच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे. पीसीसीओईआरच्या सिव्हील, कॉम्प्युटर, इलेक्ट्रोनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या चारही विभागांनी एन. बी. ए. मानांकनासाठी आवश्यक असणा-या सर्व अटींची पुतर्ता करीत पुढील तीन वर्षांसाठी हे मानांकन पटकावले आहे.
पीसीसीओईआरची स्थापना सात वर्षांपुर्वी झाली आणि परीक्षणाच्या पहिल्याच फेरीत चारही विभागांनी हे मानांकन मिळवणे हि अभिमानास्पद कामगिरी आहे. पीसीसीओईआर बौद्धिक संपत्ती हक्क (आयपीआर) यामधील अनेक जागतिक उच्चांक व सिप्सीज या राष्ट्रीय परिषदेसाठीही बहुचर्चित आहे. या महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. या अभियांत्रिकी महाविद्यालयात दिले जाणारे तंत्रशिक्षण हे जागतिक दर्जाचे आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, वर्तन आणि वृत्ती अशा गुणविशेषांवर महाविद्यालयात विशेष लक्ष देण्यात येते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व त्यांची पदव्युत्तर व्यावसायिक वाटचाल यासाठी महाविद्यालयाचे योगदानही प्रशंसनीय आहे. याची नोंद घेऊन एन.बी.ए. मानांकन देण्यात आली. याबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव श्री. विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष श्री. एस.डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पीसीसीओईआर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी तसेच विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन बोबडे, डॉ. अर्चना चौगुले, डॉ. राहुल मापारी, डॉ. रमेश राठोड, रजिस्ट्रार प्रकाश येवले व समन्वयक प्रा. श्वेता कोपरडे यांचे अभिनंदन केले.
या विषयी माहिती देताना पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी सांगितले की येथे उत्तम विद्यार्जन करण्यास व उत्तमोत्तम सेवाव्रती व्यावसायिक घडविण्यास कटीबद्ध आहोत. सुरुवातीपासूनच पीसीसीओईआरची वाटचाल शैक्षणिक प्राविण्य, संशोधन व नवनिर्माण, व्यवसायाभिमुखता आणि सामाजिक बांधिलकी या चतु:सुत्रीवर असून विद्यार्थ्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर क्रीडा, सांस्कृतिक आदि सर्वांगीण विकासावर भर दिल्याने एन.बी.ए. परीक्षणास आम्ही आत्मविश्वासाने सामोरे गेलो. सर्व विश्वस्तांचे उत्कृष्ट मार्गदर्शन, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे सांघिक योगदान यामुळे हे मानांकन आम्हास प्राप्त झाल्याचे पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी सांगितले.