नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याची जागतिक स्थिती लक्षात घेता भारताला अनेक संधी उपलब्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की, देशाची आर्थिक प्रगती, लसीकरणाची गती आणि स्वदेशी लशीची निर्मिती यामुळे जागतिक पातळीवर विश्वास निर्माण झाला आहे. संसदेच्या सर्व सदस्यांनी चर्चेत सहभागी व्हावं, हे अधिवेशन देशाच्या आर्थिक प्रगतीची संधी ठरावं या दृष्टीनं ते अधिक फलदायी करण्यासाठी प्रयत्न करावे, असं आवाहन मोदी यांनी सर्व राजकीय पक्षाना केलं.