मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या उत्पादनांना किमान आधारभूत दर देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर, किमान आधारभूत दर योजना अधिक प्रभावी करण्यासाठी एक समिती नेमली जाईल, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ही समिती स्थापन करण्याबाबतचा विषय सरकारनं निवडणुक आयोगाकडे मांडला होता. त्यावर निवडणुका झाल्यानंतर ही समिती स्थापन करण्याची सूचना आयोगानं केल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं किमान आधारभूत दर दीड पटीनं वाढवले असून, त्या दरानं शेतकऱ्यांकडून खरेदी सातत्यानं सुरु आहे, असं, कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी सांगितलं.