नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं थेट प्रचार आणि रोड शोवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या दरम्यान कोविड महामारी संदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, आयोगानं राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांना जास्तीत जास्त एक हजार किंवा ५० व्यक्तींसह मोकळ्या जागांवर प्रत्यक्ष सार्वजनिक सभा घ्यायला परवानगी दिली आहे. आयोगानं घरोघरी प्रचाराची मर्यादा १० ते २० व्यक्तींवरून वाढवली आहे आणि जास्तीत जास्त ५०० व्यक्तींच्या अथवा सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांच्या बंदीस्त जागेतील बैठकांसाठी मर्यादा वाढवली आहे.