पिंपरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच दोन्ही राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे. महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या वापरात शासकीय वाहने आहेत.

निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या वापरातील शासकीय वाहन जमा केले. त्यानंतर रिक्षातून महापौर जाधव घरी रवाना झाले. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत किमान सव्वा महिने पदाधिका-यांच्या सरकारी वाहन वापरावर निर्बंध आहेत.