नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात संस्थात्मक रोजगारात 22 टक्क्यांची वाढ झाल्याचं केंद्रीय रोजगार आणि श्रममंत्री भुपेंद्र यादव यांनी आज पुरवणी मागण्या दरम्यान राज्य सभेत दिली. जुलै ते सप्टेंबर 2021 दरम्यान केलेल्या  दुसऱ्या त्रैमासिक सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. या दरम्यान 2 लाख संस्थात्मक रोजगार निर्माण झाले, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही रोजगार निर्मितीत वाढ झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेनं मार्गक्रमण करत असल्याचं ते म्हणाले. वर्ष 2019-20ला याच दरम्यान देशातला रोजगार दर खालावला होता, असंही त्यांनी सांगितलं.