नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून सुमारे ३० लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे देशभरात आतापर्यंत लाभार्थ्यांना मिळालेल्या मात्रांची एकूण संख्या १७३ कोटी ५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात सुमारे ७५ कोटी ६० लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १ कोटी ६६ लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ६ कोटी ८० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून २ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १५ कोटी २३ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ६ कोटी ४० लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १३ लाख ३० हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ४२ लाख ८२ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.