नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सव आयोजित केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी  कुडाळ इथं आज केली. दशावतारी कला ही जनजागृती सोबतच मनोरंजन करणारी कला आहे. दशावतार कलेचा वारसा कायमस्वरूपी सर्वांसमोर राहिला पाहिजे या हेतूनं सिंधुदुर्गात सुधीर कलिंगण यांच्या नावानं दरवर्षी दशावतार महोत्सव राज्य शासनामार्फत घेण्यात येईल. नाविन्यपूर्ण योजनेतून त्यासाठी निधी दिला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.  सुधीर कलिंगण यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात कुडाळ इथं ते आज बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदारांच्या वतीने पाच लाख रुपयाचा निधी कलिंगण कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.