नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जी २० देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांच्या बैठकीत सहभाग नोंदवला. सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती आणि २०२२ या वर्षासाठी जी २० देशांचा प्राधान्यक्रम यावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत त्यांनी जागतिक आर्थिक परिस्थिती, महागाईचा धोका, पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी आणि कोरोनाचे नवे उपप्रकार यावर मत व्यक्त केली. अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोना लशींचं समान आणि जलद वितरण करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.