नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान दोन नव्या मार्गिकांचं लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे केलं. ६२० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पात सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, ३ मोठे पूल आणि २१ लहान पुलांचं बांधकाम केलं आहे. या नवीन मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळी मार्गिका उपलब्ध झाली असून, त्यामुळे उपनगरी गाड्यांच्या आणखी ३६ फेऱ्या चालवणं शक्य झालं आहे.