नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमध्ये क्वीन्सटाउन इथं आज झालेल्या महिला क्रिकेट मधल्या ५ सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी निर्णायक आघाडी घेतली. विजयासाठी एकूण २८० धावांचा पाठलाग करताना, अमेलिया केरच्या ६७, लॉरेन डाउनच्या ५२ चेंडूत नाबाद ६४ धावा, केटी मार्टिनच्या ३५ आणि फ्रान्सिस मॅकेच्या नाबाद १७ धावांच्या जोरावर न्यूझीलंड संघानं भारतावर विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना ४९ पूर्णांक ३ षटकांत २७९ धावा केल्या होत्या तर अनुभवी झुलन गोस्वामीनं ३ बळी घेतले आणि इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक बळी घेतला.