नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किंमती वेगानं वाढत असून त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी दिला आहे.

रशिया-युक्रेन दरम्यान सुरु असलेलं युद्ध तसंच चीन मध्ये कोविडमुळे वारंवार होत असलेल्या टाळेबंदी जागतिक मंदीला कारणीभूत असून विकसनशील देशात अन्न, ऊर्जा आणि खतांची टंचाई जाणवत आहे, असंही ते आज म्हणाले.