नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेब्रुवारी महिन्यात वस्तू आणि सेवाकरापोटी १ लाख ३३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. हे प्रमाण मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जमा झालेल्या महसुलापेक्षा १८ टक्क्यानं, तर फेब्रुवारी २०२० मधल्या संकलनापेक्षा २६ टक्क्यानं जास्त आहे, असं मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातून फेब्रुवारीमध्ये १९ हजार ४२३ कोटींचा महसूल जमा झाला. गेल्यावर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत त्यात २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. वस्तू आणि सेवाकरापोटी जमा झालेल्या महसुलानं, आत्तापर्यंत एकूण पाच वेळा १ लाख ३० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असल्याचं, मंत्रालयानं कळवलं आहे.