नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेने आजपासून फिचर फोन धारकांसाठी यु पी आय ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत या सेवेचा प्रारंभ केला. भारतात सध्या सुमारे ४० कोटी लोक या फिचर फोन्स चा वापर करत आहेत. हे फिचर फोन , की पॅड युक्त असून स्मार्ट फोनपेक्षा स्वस्त असतात, पण त्यात आतापर्यंत युपीआय सुविधा वापरता येत नसल्यामुळे फिचर फोन धारक डिजिटल पेमेम्ट करू शकत नव्हते. यापुढं त्यांनाही डिजिटल पेमेंट करता येईल.
या सुविधेचं नाव ‘युपीआय १२३ पे’ असं असून यासाठी इंटरनेटची गरज नसेल. हि सुविधा सध्या फक्त इंग्लिश आणि हिंदी भाषेत उपलब्ध असली तरी पुढे ती अनेक भारतीय भाषा मध्येही वापरता येईल असं बँकेनं म्हटलं आहे. शक्तिकांत दास यांनी आज सतत कार्यरत असणाऱ्या डिजिटल पेमेंट हेल्पलाइनचाही प्रारंभ केला. या हेल्पलाइनद्वारे डिजिटल पेमेंटसंबंधातील नागरिकांच्या शंकांचं निरसन होईल.