नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राज्य सरकारांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे. ते सिक्कीमध्ये तारकू इथं उभारल्या जात असलेल्या नव्या विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभाला संबोधित करत होते.

नव्या शैक्षणिक धोरणात जीवनोपयोगी शिक्षणावर, शिकवण्याच्या पद्धतींची गुणवत्ता वाढवण्यावर आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे. हे धोरण २१ व्या शतकाच्या अपेक्षा पूर्ण करणारं आहे असं ते म्हणाले. या धोरणाच्या अमंलबजावणीसाठी सिक्कीम शैक्षणिक सुधारणा आयोगाची स्थापना केल्याबद्दल त्यांनी सिक्कीम राज्य सरकारची प्रशंसाही केली.