नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंटरनेटची वाढती उपलब्धता आणि लोकांच्या उत्पन्नात होणारी वाढ, यामुळे २०३० पर्यंत, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था ८०० अब्ज डॉलरस् पर्यंत विस्तारेल, अशी आशा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे.
सीतारामन यांनी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढच्या तीन वर्षांत भारतातल्या फिन्टेक उद्योग क्षेत्राचं एकत्रित मूल्यांकन १५० अब्ज डॉलर पर्यंत वाढेल असं त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे भारतातल्या स्टार्टअर्पना सहज आर्थिक मदत उपलब्ध होत आहे, आणि बहुतांश युनिकॉर्न स्टार्टअप हे फिन्टेक क्षेत्रातले आहेत असं त्यांनी सांगितलं.