नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज आज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. कामकाज सुरू होताच दरवाढ, कामगार संघटना संप तसंच राजस्थानातले दलित अत्याचार या मुद्द्यांवर विरोधकांचे स्थगन प्रस्ताव अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळले. त्यानंतर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केल्यामुळे कामकाज तहकूब झालं.