नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर विशेष कार्यक्रम राबवावेत असा मुद्दा खासदार संभाजीराजे यांनी आज संसदेत उपस्थित केला. शोषित आणि वंचित समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराजांनी देशात सर्वप्रथम बहुजन समजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिलं. महाराजांनी मल्लविद्येला विशेष प्रोत्साहन दिलं. त्यांनीच सहकार चळवळीचा पाया रोवला. मात्र, राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या जीवन आणि कार्याबद्दल फारशी माहिती प्रकाशित झालेली नाही. भावी पिढीला या महान व्यक्तीबद्दल जाणून घेता यावं यासाठी, छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त, केंद्र शासनानं ६ मे पासून वर्षभर देशव्यापी कार्यक्रम आयोजित करावेत असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं.