नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल जीवन मिशन मुळे देशाच्या विकासाला उत्तेजन मिळत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांहून कमी कालावधीत कोट्यवधी घरांना पाणीपुरवठा करण्यात आला असून हे जनतेच्या आकांक्षा आणि जन आंदोलनाचं उदाहरण आहे, असंही त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं आहे. पेय जल सुविधा देशातल्या १७ लाख शाळा आणि अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचली आहे. जल जीवन अभियानाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ९ कोटी ४० लाख कुटुंबाना नळाद्वारे पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.