नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध पातळ्यांवर विक्रीव्यवहाराचा घोटाळा केल्यावरुन अँमवे इंडीया एंटरप्रायझेस या खाजगी कंपनीच्या 757 कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेवर ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने टांच आणली आहे. यात अँमवेचा तमिळनाडूतला कारखाना, जमीन, यंत्रसामुग्री, वाहनं, बँक खाती, आणि बँक ठेवींचा समावेश आहे.
अँमवे कंपनीची विविध ग्राहकोपयोगी उत्पादनं नेटवर्क ट्वेंटीवन या विक्रीयंत्रणेमार्फत विकण्यासाठी प्रतिनिधी म्हणून अनेकांना जाळ्यात ओढलं जात असे. उच्च राहणीमानाची स्वप्नं दाखवून अशा अजाण एजंटांमार्फत अनेक सर्वसाधारण बाजारमूल्यापेक्षा अनेक पटींनी जास्त किमतीने ही उत्पादनं विकली जात असत आणि त्याचा फायदा विक्री यंत्रणेतल्या सर्वात वरच्या स्तरातल्या सदस्यांना फक्त मिळत असे, असं संचालनालयाच्या तपासात आढळलं आहे.
२००२ ते २०२२ या कालावधीत कंपनीनं २७ हजार ५६२ कोटींचा निधी व्यवसायातून गोळा केला. त्यापैकी केवळ ७ हजार ५८८ कोटी रुपये भारत आणि अमेरिकेतल्या प्रतिनिधींना देण्यात आल्याचं ईडीच्या पत्रकात नमूद करण्यात आलंय.