नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत योजने अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजित आरोग्य मेळाव्याचा २७ लाखाहून अधिक जणांनी लाभ घेतला अशी माहिती आरोग्य मंत्रालयीन दिली आहे. देशभरात ३ हजारहून जास्त आरोग्य केंद्रात एका आठवड्यापासून आरोग्य मेळ्याचं आयोजन केलं जात आहे.
गेल्या आठवड्यात देशभरात ३ लाख ६६ हजारहून जास्त आभा ओळखपत्र तर १ लाख १७ हजारहून जास्त प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना कार्ड वितरित करण्यात आले. या काळात १ लाख ७६ हजाराहून जास्त जणांना दूरध्वनी द्वारे आरोग्य सल्ला देण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आरोग्य मंत्रालय राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसह आयुष्मान भारत योजनेचा चौथा वर्धापन दिन साजरा करत आहे.