नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणाच्याही प्रभावाखाली न राहता भारत आता जगाशी स्वतःच्या शर्तीवर व्यवहार करेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते रायसीना संवादात बोलत होते.
आगामी २५ वर्षात भारत जागतिकीकरणाच्या पुढच्या टप्प्यावर गेलेला असेल असं सांगून ते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीला २५ वर्ष पूर्ण होत असताना भारताने प्रगतीचा आणखी २५ वर्षांचा टप्पा ओलांडला असेल.
आपली लोकशाही प्रवृत्ती भारताने जगात सिद्ध केली असून भविष्यातही लोकशाहीच्या जतनाची ग्वाही दिली आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. युक्रेन संघर्ष युद्ध थांबवून संवादामार्फत सोडवणंच गरजेचं आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.