मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले असून ऊस गाळपाच प्रमाणही वाढले आहे. त्यामुळं ऊस तोडणीला वाहतुकीसाठी २०० रुपये प्रति टन अनुदान दिलं जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत केली. सांगलीतल्या पुराच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, अनेक ठिकाणी जुने ओढे-नाले बुजवून इमारती बांधण्यात आल्या. हेच पाणी इतरत्र पसरून पूर येतो. या सर्वांचं योग्य नियोजन झालं पाहिजे.
सांगली महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारतर्फे 100 कोटी रुपये अनुदान दिले जातील. मिरज इथल्या मीरासाहेब दर्गा परिसर विकासासाठी 100 कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. याबाबत प्रस्ताव आल्यावर तत्काळ निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी जाहीर केलं.