नवी दिल्ली : रेडियो आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारक यांच्यातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजूरी दिली आहे.

लाभ:

परदेशी प्रसारकांबरोबरच्या या करारामुळे पुढील मदत मिळेल:

  1. सार्वजनिक प्रसारकांना नव्या कल्पनांचा शोध घेता येईल.
  2. नवीन तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मक युगातील गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन रणनिती आखणे.
  3. माध्यमांचे उदारीकरण
  4. जागतिक

प्रमुख प्रभाव:

परस्पर आदान-प्रदान आणि सहनिर्मितीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रसारणामुळे दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रेक्षक आणि श्रोत्यांमध्ये समानता आणि सर्वसमावेशकतेचे वातावरण निर्माण होईल. तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान आणि मनुष्यबळ प्रशिक्षणामुळे सार्वजनिक प्रसारकांना प्रसारण क्षेत्रातल्या नवीन आव्हानांचा सामना करण्यास मदत मिळेल.