पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलै 2019 पासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करायला मंजूरी दिली आहे. मूळ वेतनावर सध्या 12 टक्के महागाई भत्ता दिला जात असून, या वाढीमुळे तो 17 टक्के होईल. 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार स्वीकृत सूत्राच्या अनुषंगाने ही वाढ करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 15,909.35 कोटी रुपये, तर चालू आर्थिक वर्षात 10,606.20 कोटी रुपये आर्थिक भार येईल. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सुमार 49.93 लाख कर्मचारी आणि 65.26 लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभ मिळेल.