मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील यापूर्वीच्या भाजप सरकारनं  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळावर केलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत. कृष्णा खोरे सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून खासदार संजय पाटील यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला होता.

ही नियुक्ती आता रद्द केली आहे. याशिवाय वीज कंपन्यांच्या एकत्रित समितीच्या  संचालक नीता केळकर यांना रस्ते विकास महामंडळाचं  संचालक पद, दिलं आहे.  प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं  संचालक पद, वस्त्रोद्योग महामंडळाचं  उपाध्यक्षपद,  औद्योगिक विकास महामंडळाचं  सदस्यपद, तर म्हाडाच्या उपाध्यक्षपदावरील  नियुक्त्या ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत.