नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, मंदिराच्या १२५ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेणाऱ्या ‘लक्ष्मीदत्त’ या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ प्राजक्ता काळे यांना मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं काल संध्याकाळी पुण्यात आगमन झालं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं.