मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या काही मालमत्तांवर काल छापे टाकले. संचालनालयानं परब यांना समन्स बजावलं होतं आणि त्यांची चौकशीही केली होती.