PRAYAGRAJ, MAR 1 (UNI):- An elderly persons receiving COVID-19 vaccine in Prayagraj on Monday.UNI PHOTO-38U

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ९३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी ५७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा तर, ३ कोटी २७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना १० कोटी ४७ लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना सुमारे ४ कोटी ९० लाख मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून देशभरात ६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून १९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी ६५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा तर, २६ लाख ७४ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.  १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६६ लाख ५२ हजार, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ३१ लाख  ७१ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ९३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी ५७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा तर, ३ कोटी २७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना १० कोटी ४७ लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना सुमारे ४ कोटी ९० लाख मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून देशभरात ६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून १९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी ६५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा तर, २६ लाख ७४ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.  १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६६ लाख ५२ हजार, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ३१ लाख  ७१ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.