नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तीन दिवसांच्या व्हिएतनाम च्या दौऱ्यावर येत्या ८ तारखेला रवाना होणार आहेत. या  भेटीदरम्यान ते व्हिएतनामला १० कोटी अमेरिकी डालर्सच्या रक्षा ऋण सुविधांनी तयार केलेल्या १२ हायस्पीड गार्ड बोटी देणार आहेत. ते व्हिएतनामचे संरक्षणमंत्री फान वान गिआंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधल्या संरक्षणसहाय्यता अधिक दृढ करण्यावर भर देणार आहेत. न्हा त्रांग इथं संरक्षणमंत्री दूरसंचार विश्वविद्यालय आणि इतर प्रशिक्षिण संस्थांना भेट देणार आहेत. भारताकडून ५० लाख अमेरिकी डॉलर्स प्राप्त अनुदानातून दूरसंचार विश्वविद्यालयामधे आर्मी सॉफ्टवेअर पार्क तयार करण्यात येत आहे.