मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही माहिती दिली. मंडळाच्या mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि hsc.mahresults.org.in या संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १४ लाख ८५ हजार १९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ६ लाख ६८ हजार ३ मुली आहेत तर ८ लाख १७ हजार १८८ मुलगे आहेत अशी माहिती शिक्षण मंडळाच्या निवेदनात दिली आहे.