नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या भूमीमधील अघोषित ठिकाणी आढळून आलेल्या युरेनियमच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण देण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या ३५ देशांच्या अणू दक्षता संघटनेनं इराण विरोधात ठराव मंजूर केला आहे.
ब्रिटन, फ्रांस, जर्मनी आणि अमेरिका या देशांनी सादर केलेल्या या ठरावाला अन्य ३० देशांनी मान्यता दिली. केवळ रशिया आणि चीननं या ठरावाला विरोध केला. मात्र, इराणनं या ठरावाचा निषेध केला. आण्विक तपास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेला तेहरान सहकार्य करत असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.