मुंबई (वृत्तसंस्था) : चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक हितेश पटेल याला काल अटक केली. मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी पटेलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

५० कोटी ८८ लाखांची खरेदी आणि ११ कोटी १९ लाख रुपयांची चुकीची कर वजावट दाखविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अन्य दोन संचालक अशोक मेवाणी व नरेंद्र पटेल यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी १९ जणांना अटक केली आहे.