मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनानं एक मोबाइल अँप सुरु केलं असून या अँपच्या माध्यमातून पंढरपुरात उपलब्ध केल्या गेलेल्या सुविधांची माहिती मिळणार आहे.

या मोबाईल अ‍ॅपवर पंढरपूर शहराची संपूर्ण माहिती, रस्ते, प्रमुख मार्ग, शौचालयाच्या सुविधा, पाणी, दवाखाना, शासकीय निवासस्थाने, नदीपात्र, मंदीर परिसर, मुख्य बाजार पेठ, रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक, पोलिस प्रशासन, महसुल प्रशासन, नगरपालिका प्रशासन यांबाबतची इत्यंभूत माहिती उपलब्ध असणार आहे. परिणामी एखाद्या सुविधेबाबत इतरांकडे चौकशी करण्याऐवजी वारकरी स्वतःच या सुविधांचा माग काढू शकणार आहेत.