शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांचा इरफानभाईंवर शुभेच्छांचा वर्षाव…

पिंपरी : कामगार तथा शिवसेना नेते इरफानभाई सय्यद यांचा वाढदिवस पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यात विविध विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आकुर्डीत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी मावळचे खा. श्रीरंग बारणे, मा. आ.  गौतम चाबुकस्वार, उद्योजक जितेंद्र जोशी, माथाडी कामगार सल्लगार समिती सदस्य संतोष शिंदे, प्रकाश वाड़ेकर, अण्णाभाऊ साठे महामंडळ सदस्य अमित गोरखे , शिवसेना महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, शहर संघटिका उर्मिलाताई काळभोर, उपजिल्हा प्रमुख नीलेश मुटके, नगरसेवक तुषार हिंगे, प्रवीण भालेकर, रवींद्र सोनवणे, डॉ.शाम अहिरराव, दत्तनाना पवळे, रोहा नगर परिषद सदस्य महेश कोल्हटकर, हजी दस्तगीर मणियार, यूवराज कोकाटे, संदीप रासकर, निलेश बोराटे, निलेश निवाळे, परशुराम आल्हाट, आशा भालेकर शिवाय शिवसेनेबरोबरच महाविकास आघाडीतील नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, माथाडी, बांधकाम कामगार, मित्र परिवार आदींनी स्नेहमेळाव्यास उपस्थिती दर्शवून इरफानभाईंवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

खा. बारणे शुभेच्छा व्यक्त करताना म्हणाले, पिंपरी चिंचवडनगरी ही कामगारनगरी आहे. या नगरीत असंघटित कामगारांचे प्रतिनिधित्व इरफानभाई शिवसेना नेते म्हणून करत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. कामगारांच्या मागण्यांना तुम्ही न्याय मिळवून देता, ही गर्दी त्याचीच साक्ष आहे.

शिवसेना महिला नेत्या सुलभाताई उबाळे यांनी स्व. कामगार नेते साबीरभाई शेख यांच्यासारखे इरफानभाई यांचे कार्य आहे. पक्षश्रेष्ठी नक्कीच याची दखल घेतील. भविष्यात कामगार मंत्री अथवा महामंडळ मिळो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

दरम्यान इरफानभाई यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणेच यंदाही वृत्तपत्रविक्रेत्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. तसेच शहरातील कामगारांसाठी रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य थाय बॉक्सिंग असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड शिवसेना अल्पसंख्याक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी लॉन येथे विभागीय थाय बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील विविध स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. राहुलदादा भोसले युथ फाऊंडेशन, देवा ग्रुप व शिवसेना शाखा मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती प्रभाग क्रमांक 13 येथील ज्ञानदा प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणि खाऊवाटप करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील राजे ग्रुपच्या वतीने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद उर्दु शाळांना उपयोगी वस्तू अनं विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच दोन वर्षानंतर हा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला असताना शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळया प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून कामगार नेते इरफान सय्यद यांचा  वाढदिवस साजरा करण्यात आला.