नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर राष्ट्रकुल देशांच्या २६ व्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवांडा देशाच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी आज रवाना होतील. रवांडा देशातल्या किंगाली इथं ही शिखर बैठक होत असून जयशंकर भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करतील. कोविडमुळे सलग दोन वर्ष ही  बैठक स्थगित झाली असून यावर्षी होत असलेल्या या बैठकीत सर्व राष्ट्रकुल देशांचे प्रमुख हवामान बदल, खाद्य सुरक्षा आणि आरोग्य सुविधांबद्दल जागतिक पातळींवरच्या समस्यांबद्दल सर्वसमावेशक चर्चा करतील. या दरम्यान जयशंकर विविध देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठक करतील तसंच रवांडा मध्ये स्थायिक भारतीय नागरिकांशी बातचीत करतील.