मुंबई (वृत्तसंस्था) : खतं आणि बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पक्की बिल देणं आवश्यक असतानाही अशी बिलं न दिल्यानं नाशिक जिल्ह्यातील ३१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागानं निलंबित केले आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासनानं शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पक्की बिलं देण्याचे आदेश दिले, मात्र प्रत्यक्ष तपासणीत अनियमितता आढळल्यानं १८ खत विक्रेते, सहा बियाणे विक्रते आणि सात कीटकनाशके विक्रेते अशा ३१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत.