नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्री दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याचा आढावा घेतील आणि द्विपक्षीय प्रतिबद्धता आणखी भक्कम करण्यासाठी नवीन उपक्रमांचा शोध घेतील. ते सामायिक हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण करतील. रिचर्ड मार्ल्स त्यांच्या चार दिवसांच्या भारत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी गोवा इथं पोहोचले. त्यांनी काल गोवा शिपयार्ड लिमिटेडला भेट दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जून २०२० पासून सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे आणि संरक्षण हा या भागीदारीचा प्रमुख आधारस्तंभ आहे.