मुंबई : प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर ‘ या ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘विशेष निवडणूक वार्तापत्र’ दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७. ४५ या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आकाशवाणीवरील ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विशेष निवडणूक वार्तापत्र’ शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७. ४५ या वेळेत प्रसारित होणार आहे. राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद,‍ नाशिक,जळगांव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या २२ आकाशवाणी केंद्रावरून हे प्रसारित केले जाईल.