नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भारताचा विकास होण्यासाठी सहकारिता क्षेत्राचं मोठं योगदान असू शकेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित शंभराव्या सहकारिता दिन कार्यक्रमात बोलत होते. जगात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम सहकारितेनंच केलं आहे, असं ते म्हणाले. भारतातही सहकारिता क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन दिल गेलं आहे. देशात गरिबांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचं काम सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं