पिंपरी : 206 पिंपरी विधानसभा मतदार संघ, श्री.सुनिल वाघमारे, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जन जागृती स्वीप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

सन 2019 चे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरीता मतदानाविषयी नागरीकांचे प्रबोधन करणे, मतदार जागृती करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी तसेच 100% मतदारांनी मतदान करण्याकरीता निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणुन दि. 10/10/2019 रोजी एक्साईड बॅटरी लि. चिंचवड या कंपनीमध्ये दुपारी 3.00 वाजता कंपनीतील दोन्ही पाळीतील 500 कर्मचारी व अधिकारी यांना मतदान करण्यासाठी व इतरांचा मतदानामध्ये सहभाग वाढविण्यासाठी स्वीप कक्ष प्रमुख श्री. मुकेश कोळप यांचे व्याख्यान झाले, तसेच मतदान जागृतीकरण्याकरीता आवाहन करुन मतदानाची शपथ देण्यात आली.

यावेळी एक्साईड बॅटरी लि. चे प्लांट हेड श्री. के अनिरुद्धा, श्री. डीसील्वा, श्री.प्रफुल जोशी सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. निवडणुक विभागाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री.सुनिल वाघमारे, स्वीप कक्षप्रमुख श्री मुकेश कोळप यांनी मार्गदर्शन केले, श्री तानाजी सावंत, श्री सुशांत जोशी, श्री. विलास केंजळे, श्री.सुधीर दारोकार यांनी संयोजन केले.