पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कै.अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबीर, नेत्रदान फॉर्म स्वीकृती शिबीर, रस्सीखेच स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा व प्लॅस्टिक वापरमुक्तीबाबत शपथ आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदान करण्याची शपथ यांचे आयोजन करण्यात आले.