मुंबई (वृत्तसंस्था) : झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासोबत आज बैठक घेतली. लवकरच सर्व अडथळे आणि कायदेशीर वाद मिटवून नागरिकांना पक्की घरे दिली पाहिजेत असं यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी वासीयांच्या पुनर्वसनासाठी सुधारित कायदा लागू केला होता. मात्र या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. गरिबांच्या घरांच्या हक्काच्या प्रश्नाबाबत खासदार गोपाळ शेट्टी सातत्याने प्राधिकरणाकडे मागणी करून पाठपुरावा करत आहेत.