नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोकडे ६० स्टार्टअपने आतापर्यंत नोंदणी केली आहे. अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केल्यानंतर हे बदल झाले आहेत. यातल्या काही कंपन्या अवकाशातल्या कचरा व्यवस्थापनासाठी कार्यरत असल्याचं केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. ते काल बेंगळुरुमध्ये बोलत होते.