नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, यांच्यासह अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा त्यांच्यासोबत होते. त्यानंतर बातामीदारांशी बोलताना आपल्यासारख्या शेतकरीपुत्राला ही संधी दिल्याबद्दल धनखड यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी आपण प्रयत्न करु असं ते म्हणाले. विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा उद्या अर्ज भरणार आहेत.

दरम्यान, जगदीप धनखड यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तो स्वीकारला आहे. पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरीक्त कार्यभार मणिपूरचे राज्यपाल एल. गणेशन यांच्याकडे दिला आहे.