नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या फेरीत त्यांची थेट लढत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रुस यांच्याशी होणार आहे.
या फेरीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे १ लाख ८० हजार सदस्य मतदान करतील. या फेरीचा निकाल ५ सप्टेंबरला जाहीर होणार असून विजेता उमेदवार ब्रिटनच्या प्रधानमंत्रीपदी विराजमान होईल. ५ व्या फेरीअखेर सुनक यांना १३७ तर ट्रुस यांना ११३ खासदारांचा पाठिंबा मिळाला. केवळ १०५ मत मिळाल्यानं व्यापार मंत्री पेनी मॉरडंट प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले.