नवी दिल्ली : दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत. फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद आणि फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डटेर्टे यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून ही माहिती दिली.
दोन्ही देश दहशतवादाच्या समस्येचा सामना करत आहेत, त्यामुळे दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षा क्षेत्रातली भागिदारी आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठीही मान्यता दिली, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये सागरी, संरक्षण, पर्यटन, सांस्कृतिक आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातले चार करारही झाले.