मुंबई : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता/ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरु करता येत नाही. मात्र शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 4 शाळा अनधिकृतपणे सुरु आहेत. या 4 शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याने प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळा
- मदर तेरेसा स्कूल, ब्लॉक नंबर 12,राजीव गांधी नगर, ट्राँझिट कँप, 90फुटरोड, धारावी, मुंबई- 17
- एन.आय.ई.एस. इंग्लिश सेकंडरी स्कूल, धारावी ट्रांझिट कँप, न्यू स्कूल कम्पाऊंड, धारावी, मुंबई- 17
- छबिलदास प्राथमिक शाळा, (सी.बी.एस.ई.बोर्ड), दादर(पश्चिम),मुंबई- 28
- मदनी हायस्कूल, 1 ला मजला,साबू सिद्दीकी मुसाफिरखाना, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई