नवी दिल्ली : जम्मू काश्मीरची पुनर्रचना करुन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे समावेशक विकासाला प्रोत्साहन मिळून सीमापार दहशतवादाला आळा बसेल असे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सियरा लियोनची राजधानी फ्रीटाऊन येथे भारतीय समुदायाला ते संबोधित करत होते. भारताचा एक शेजारी, दहशतवादी कारवायांना खतपाणी घालून, त्यासाठी पैसा पुरवून त्रास निर्माण करत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये हजारो लोक मारली गेली आहेत. दहशतवादाला धर्म नसतो असे सांगून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या राष्ट्राला एकाकी ठेवण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.